This page has not been fully proofread.

१८
 
मेघदूताचें समवृत्त
 
भाषान्तर•
 
विस्तारी जो कलंमधुरशा सारसांच्या स्वनातें ।
फुल्लाब्जांचा परिमल हरी स्पर्शुनीया तयांतें ॥
ऐसा सिप्रानिल हरि तिथें स्त्रीरतिग्लानि, जाणें ।
प्रातःकालीं प्रणयैकुशल प्राणनाथाप्रमाणें ॥ ४० ॥
मूलश्लोक (क्षेपक. )
हारांस्तारांस्तरलगुटिकान् कोटिशः शंखशुक्तीः ।
शप्पश्यामान् मरकतमणीनुन्मयूखमरोहान् ॥
दृष्ट्वा यस्या विपणिरचितान् विद्रुमाणां च भंगान् ।
संलक्ष्यते सलिलनिधयस्तोयमात्रावशेषाः ॥ अ ॥
 
भाषान्तर.
 
सद्रत्नांचीं रुचिर पदकें ज्यांस, ते दिव्य हार ।
कंर्बू, सुँक्ती, मरकतमणी तेज ज्यांलागि फार ॥
पाहोनिया बिपणिर्त तिच्या विद्रुमांचेहि राशी ।
झाले अन्वर्थक जैलनिधी काय वाटे मनाशी ॥ अ ॥
मूलश्लोक (क्षेपक.)
 
प्रद्योतस्य प्रियदुहितरं वत्सराजोऽत्र जड़े ।
हैमं तालद्रुमवनमभूत्र तस्यैव राज्ञः ॥
अत्रोद्भ्रान्तः किल नलगिरिः स्तंभमुत्पाट्य दर्पा
दित्यागन्तून् रमयति जनो यत्र बन्धूनभिज्ञः ॥ ब ॥
 
१. पसरी. २. अस्पष्ट आणि गोड अशा. ३. सिप्रा नदीवरील
वायु. उज्जयिनी सिप्रानदीवर वसलेली आहे. ४. स्त्रियांना संभोगामुळे
येणारा थकवा किंवा शीण त्याला. ५. प्रेम दाखविण्यांत चतुर. ६.
शंख ७. शिंपा. ८. बाजारांत. ९. पोंवळ्यांचे. १०. अर्थाीला अनुसरून,
अर्थाप्रमाणें, अर्थात् खरेखरे. ११. पाण्याचे साठे, जलनिधींना
रत्नाकर असेंही नांव आहे, परंतु त्यांतील सगळी रत्नँ उज्जयिनीच्या
बाजारांत विकायला गेल्यामुळे रत्नाकरांचें रत्नाकरत्व नाहींसें होऊन
त्यांचें जलनिधि हैं नांव मात्र त्यांत निवळ पाणी शिलक राहि
ल्यामुळे अन्वर्धक झाले असा भाव.