This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेव,
 
जीर्णी पर्णी तटतरुचिया पाण्डुता ये जियेला ॥
ऐशी सिन्धू बहुत झुरते, भाग्यवन्ता, तियेतें ।
जातां जातां सुखित करिं तूं देउनी जीवनातें ॥ ३८ ॥
 
मूलश्लोक.
प्राप्यावंतीनुदयनकथाकोविदग्रामवृद्धान् ।
पूर्वोद्दिष्टामनुसर पुरीं श्रीविशालां विशालां ॥
स्वल्पीभूते सुचरितफले स्वर्गिणां गां गतानां ।
शेषैः पुण्यैर्हतमिव दिवः कान्तिमत्खण्डमेकम् ॥ ३० ॥
 
१७
 
भाषान्तर.
 
मार्गामध्यें बघशिल पुढे देश नामें अंवन्ती ।
मोठे ज्ञानी उदयनकथाभिज्ञ ही त्यांत होती ॥
पूर्वोक्ता ती बघ मग पुरी जाउनीया विशाला ।
लक्ष्मीनें ती रुचिर दिसते तेविं आहे विशाला ॥ ३९ ॥
येतां भूमीवरि सुँकृतिनीं शेष्यपुण्यें जणों कीं ।
हा स्वर्गाचा सुभग अणिला भाग खालीं, विलोकीं ॥
मूलश्लोक.
 
दीर्घाकुर्वन् पटुमदकलं कूजितं सारसानां
प्रत्यूषषु स्फुटितकमलामोदमैत्रीकषायः ॥
यत्र स्त्रीणां हरति सुरतग्लानिमंगानुकूलः ।
शिगावातः प्रियतम इव प्राथनाचाटुकारः ॥ ३१ ॥
 
१. उदकातें आणि अर्थात् त्यामुळे जीवितातें. २. नर्मदेच्या
उत्तरेकडील प्रान्त. याची राजधानी उज्जयिनी. हिलाच विशाला,
आणि अवन्तिपुरी किंवा अवन्ती हीं नांवें आहेत. 3. कोशांबी नग-
रीचा राजा; त्याची गोष्ट जाणणारे. उदयनाची गोष्ट प्रसिद्ध आहे
ती अशी: उज्जयिनीचा राजा प्रद्योत याला वासवदत्ता नांवाची एक
कन्या होती. ती उपवर झाली तेव्हां तिच्या बापाने तिला संजय
नांवाच्या राजास देऊं केली होती. तथापि वासवदुत्तेनें वर सांगित-
लेल्या उदयन राजाला स्वप्नांत पाहिले. त्याच्या सौंदर्याने ती मोहित
झाली व तिनें त्यास गुप्त निरोप पाठविला. त्यावरून उदयन राजानें
तिचें बलात्कारानें हरण केलें. ४. उज्जयिनी. ५. भव्य. ६. पुण्यवान्
लोकांनीं, ७. शिलक राहिलेल्या पुण्यानें.