This page has not been fully proofread.

२६
 
मेघदूताचें समवृत्त
 
भाषान्तर•
 
नाहीं मागामाधं जरी तुझ्या ती पयोदा विशालौ ।
सौधोत्संगां तरि बघ तिच्या एकदां तूं विशाला ॥
विद्युल्लेखाँ-चकित तरैलापांग पौरांगनांचे ।
पाहोनीया रमशि न तरी नेत्रैवैफल्य साचें ॥ ३६ ॥
मूलश्लोक.
 
वीचिक्षोभस्तनितविहग श्रेणिकांचीगुणायाः ।
संसपत्याः स्खलितसुभगं दर्शितावर्तनाभेः ॥
निर्विन्ध्यायाः पाथ भव रसाभ्यन्तरः संनिपत्य ।
स्त्रीणामाद्यं प्रणय-वचनं विभ्रमो हि प्रियेषु ॥ २८ ॥
 
भाषान्तर•
 
जीची काँची मधुचना हंसमाला विराजे ।
शोभे लीलागमन, सलिलाँवर्त तो नाभि साजे ॥
निर्विन्ध्येच्या अनुभविं अशा, हे रसैज्ञा ! रसास ।
स्त्रीप्रेमाचें खचित पहिलें चिन्ह आहे विलास ॥ ३७ ॥
मूलश्लोक.
 
वेणीभूत
प्रतनुसलिलासावतीतस्य सिन्धुः ।
 
पाण्डुच्छाया तटरुहतरुभ्रंशिभिर्जीर्णपणैः ॥
सौभाग्यं ते सुभगविरहावस्थया व्यंजयन्ती ।
कार्ये येन त्यजति विधिना स त्वयैवोपपाद्यः ॥ २९ ॥
 
भाषान्तर.
 
वाटे वेणीसम कृश जिची वारिधारा मनाला ।
 
१. उज्जयिनी. २. वाड्यांच्या शिखरांस 3. विजेच्या प्रकाशानें
भयभीत झालेले. ४. चंचल कटाक्ष. ५. पुरींतील स्त्रियांचे. ६. डो-
ळ्यांची निष्फलता. ७. कमरपट्टा. ८. गोड शब्द करणारी. ९. विला-
सानें किंवा तोयानें चालणें. १०. पाण्याचा भोंवरा. ११. एका
नदीचें नांव. १२. हे रसिका ! या श्लोकांत निर्विन्ध्येवर स्त्रीची
कल्पना करून तत्तीरस्थ मधुर शब्द करणाऱ्या हंसमालेवर कांचीची,
तिच्या अडखळत वाहणाऱ्या प्रवाहावर लीलागमनाची आणि तिच्या
सलिलावर्तावर नाभीची कल्पना केली आहे.
 
1