This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
त्वत्संयोगें फुलतिल, घना, तत्कैदंबड सारे ।
 
प्रेमें त्याच्या तनुवरि जणों काय कांटा थरारे ॥ ३४ ॥
तो पण्यस्त्रीरतिपरिमला सोडिन्यां कंदरांहीं ।
त्यो पौरांचा प्रकट करितो यौवँनोन्माद पाहीं ॥
 
मूलांक.
 
विश्रान्तः सन् व्रज वननदीतीरजातानि सिंच- ।
द्यानानां नवजलकणैर्यूथिकाजालकानि ॥
गण्डस्वेदापनयनरुजा क्लान्तकर्णोत्पलानां ।
छायादानात् क्षणपरिचितः पुष्पलावीमुखानाम् ॥ २६ ॥
 
भाषान्तर.
 
जातां मार्गी मग वने॑नदीतीरच्या त्या सुजाणा ।
सिंचोनिया सलिल, फुलवीं यूथिकाजालकांना ॥
तैसें, गालांवरिल पुसतां घर्म दोन्ही करांनीं ।
ज्यांची कर्णावरिल कमलें पूर्ण गेलीं सुकोनी ॥ ३५ ॥
कारुण्यानें घडिभरि अशा माळिणींच्या मुखांतें ।
थोडी छाया करुनि निववीं त्यांचिया आतंपातें ॥
मूलश्लोक.
 
१५.
 
वक्रः पंथा यदपि भवतः प्रस्थितस्योत्तराशां ।
सौधोत्संगप्रणयविमुखो मा स्म भूरुज्जयिन्याः ॥
विद्युद्दामस्फुरितचकितैस्तत्र पौरांगनानां ।
लोलापांगैर्यदि न रमसे लोचनैर्वैचितोऽसि ॥ २७ ॥
 
१. त्या पर्वतावरील कळंबाची झाडें. पावसाळ्यांत कळंबाची झाडें
फुलतात. २. वारांगनांशी झालेल्या संभोगाच्या सुगंधास. हें 'सोडि-
त्यां' याचें कर्म. 3. सोडणाऱ्या. हें ' कंदरांही' याचें विशेषण.
४. गुहांच्या योगानें. ५. त्या विदिशा नगरीतील तरुण विलासिनी
पुरुषांचा. ६. तारुण्याचा भर. ७. वनांतील नद्यांच्या कांठांवर उग-
वलेल्या. ८. जाईच्या कळ्यांना ९. तापातें.