This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
हुंगोनीया अधिकं वसुधा-गंध तेवीं मृगांचा ।
गेलासी तूं इकडुनि असा तर्क धांवेल साचा ॥ ३० ॥
मूलश्लोक.
 
उत्पश्यामि द्रुतमपि सखे मत्प्रियार्थी यियासोः ।
कालक्षेप ककुभसुरभौ पर्वते पर्वते ते ॥
शुक्लापांगैः सजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः ।
प्रत्युद्यातः कथमपि भवान् गंतुमाशु व्यवस्येत् ॥ २२ ॥
 
भाषान्तर•
 
माझ्या कार्याविषयिं तुजला फार औत्सुक्य आहे ।
मार्गामध्यें परि अडचणी फार येतील पाहे ॥
अद्री अद्रीवरुनि कुटैजामोद येईल थोर ।
शब्द प्रेमें करितल तुला पाहुनी तेथ मोर ॥ ३१ ॥
आतिथ्याच्या पडुनि असल्या सोहळ्यामाजि माझी ।
होवो ना विस्मृति, जलधरा, प्रार्थना हेचि आजी ॥
मूलश्लोक.
 
पाण्डुच्छायोपवनवृतयः केतकैः सूचिभिन्नै ।
र्नीडारम्भैगृह बलिभुजामाकुलग्रामचैत्याः ॥
त्वय्यासन्ने परिणतफलश्यामजंबूबनान्ताः ।
संपत्स्यन्ते कतिपयदिनस्थायिहंसा दशार्णाः ॥ २३ ॥
 
भाषान्तर.
 
लागे मार्गी जनपद पुढें तो दशौर्णाख्य देख ।
त्वत्संयोगें दिसतिल चमत्कार तेथें अनेक ॥
 
१. पावसाच्या पहिल्या सरीच्या वेळेस जमिनीतून नेहमीपेक्षा
जास्त सुगंध येतो हैं अनुभवसिद्ध आहे. २. याचा संबंध ' तर्क "
पदाकडे आहे. 3. कुड्यांच्या फुलांचा वास. ४. देश. ५. दशा-
नांवाचा. हा देश विध्याद्रीच्या उत्तरेस असावा. रा. सा. पाठक
चास छत्तीसगड असे म्हणतात. यांतून दशार्ण नांवाची नदी वाहते...
२. तुझ्या आगमनानें.