This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर -
 
र-पूर्वमेघ.
 
स्त्वय्यारूढे शिखरमचलः स्निग्धवेणीसवर्णे ॥
नूनं यास्यत्यमरमिथुनप्रेक्षणीयामवस्थां ।
 
मध्ये श्यामस्तन इव भुवः शेषविस्तारपाण्डुः ॥ १८ ॥
 
भाषान्तर.
 
ज्याचे गेले तट भरुनिया पक्क आम्रद्रुमांनीं ।
त्वत्संयोगें शिखर विलसे तेविं तें नीलवर्णी ॥
तेणें अद्री अरमिथुनांलागि भासेल जाण ।
अग्रीं काळ्या भ॑वतिं पिंवळ्या भूस्तैनाच्या समान ॥ २५ ॥
मूलश्लोक.
 
स्थित्वा तस्मिन् वनचरवधूभुक्तकुंजे मुहूर्त ।
तोयोत्सर्गद्रुततर गतिस्तत्परं वर्त्म तीर्णः ॥
रेवां द्रक्ष्यस्युपल विषमे विन्ध्यपादे विशीर्णी ।
भक्तिच्छेदैरिव विरचितां भूतिमंगे गजस्य ॥ १९ ॥
 
भाषान्तर•
 
त्या शैलाच्या वरि विलसती कुंजही मेघराया ।
केव्हां केव्हां विहरति तिथें संभ्रमें भिल्लुंजाया ॥
तेथें थोडाबहुत बसुनी वारि वर्षोनि, वेगें,
आकाशांत प्रतनु- तनु तूं जावया मार्ग लागे ॥ २६ ॥
विंध्याद्रीच्या अवघड कड्यांतोनि टाकी उड्या ती ।
रेवाँ दृष्टी पडुनि पुढतीं तोष होईल चित्तीं ॥
जेवीं अंगीं रुचिर दिसती रंगरेषा करीच्या ।
तेवीं शोभा वरिल तटिनी प्रस्तरीं त्या गिरीच्यौ ॥ २७ ॥
 
१.. देवांच्या जोडप्यांस. २. भूदेवीच्या स्तनासारखा. 3. लतां-
नीं आच्छादिलेली घरें; लतामंडप. ४. भिल्लांच्या बायका. ५. (वृष्टी
केल्यामुळे) अतिशय हलकी झाली आहे तनु म्हणजे शरीर
असा. हैं ' तूं' या पदाचें विशेषण. ६. प्रसिद्ध. ७. नर्मदा नदी.
८. रंगाचे पट्टे. ९. नदी. १०. पाषाणांवर. ११. अमरकंटकाच्या.
हत्ती मूळचा काळा असून त्याच्या अंगावर चित्रविचित्र वर्णरचना
केली ह्मणजे तो जसा दिसतो तसा नर्मदेचा प्रवाह अमरकंटकाच्या
शिलासंघातावर दिसेल असा अर्थ.