This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
दिनागांच्या परिहरुनिया हस्तँचेष्टांस मार्गे ॥ १९ ॥
"शैलाचें कीं शिखर उडवी, बाइ ! वारा नभांत "।
येवोनीया क्षणभरि अशी कल्पना मानसांत ॥
वक्त्रांभोजां करुनि वरतीं मुग्ध त्या सिर्द्धजाया ।
जातां जातां बघतिल तुला विस्मयें, मेघराया ॥ २० ॥
मूलश्लोक.
 
रत्नछायाव्यतिकर इव प्रेक्ष्यमेतत्पुरस्ता ।
द्वल्मीकाग्रात्मभवति धनुःखण्डमाखण्डलस्य ॥
येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते ॥
बर्हेणेव स्फुरितरुचिना गोपवेषस्य विष्णोः ॥ १५ ॥
 
भाषान्तर.
 
नानारंगीं अति रुचिर हा चाप देवेश्वराचा ।
काळ्या देहापुढतिं तुझिया शोभतो फार साचा ॥
ऐशा वेळीं दिसशिल, घना, तूं जनालागि तेवीं ।
बहीँ वृन्दावनपरिसरीं देवेंकीसूनु जेवीं ॥ २१ ॥
मूलांक.
 
त्वय्यायत्तं कृषिफल मिति भूविलासानभिज्ञैः ।
प्रीतिस्निग्धैर्जनपदवधूलोचनैः पीयमानः ॥
सद्यः सीरोत्कषण सुरभिक्षेत्रमारुह्य मालं ।
किंचित् पश्चाद् व्रज लघुगतिर्भूय एवोत्तरेण ॥ १६ ॥
 
१. दिग्गजांच्या पृथ्वी स्थिर राहण्याकरितां प्रत्येक दिशेच्या शे-
वटी एक एक हत्ती ठेविला आहे असें वर्णन पुराणांतून आढळतें. या
हत्तींस दिग्गज असें म्हणतात. २. समाचार घेऊन 3. सोंडेच्या चा-
ळ्यांस. ४. मुखकमलांस. ५. भोळसर ६. सिद्ध हे देवयोनिविशेष
आहेत; त्यांच्या बायका. ७. इंद्राचा. ८. मोराच्या पिसांनी.
श्रीकृष्णानें बालवयांत
असें वर्णन आहे.
 
९. वृन्दावनाच्या सभोवतालच्या प्रदेशांत.
गोपवेषानें या ठिकाणीं क्रीडा केली
१०. श्रीकृष्ण.