This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
आहे मोठा जिवलग तुझा मित्र फारा दिसांचा ।
तेव्हां त्याला पुसुनि पुढतीं मार्ग तू चाल साचा ॥ १७
प्रत्यब्दीं तो बघुनि तुजला ढाळितो बाप फार ।
त्या योगानें तुजवरि दिसे प्रेम त्याचें अपार ॥
मूलश्लोक.
 
मार्गे तावच्छृणु कथयतस्त्वत्प्रयाणानुरूपं ।
संदेशं मे तदनु जलद श्रोष्यास श्रोत्रपेयम् ॥
खिन्नः खिन्नः शिखरिषु पदं न्यस्य गन्तासि यत्र ।
क्षीणः क्षीणः परिलघु पयः स्रोतसां चोपभुज्य ॥ १३
 
भाषान्तर.
 
होती अद्री मधुनि मधुनी शीण येतां बसाया ।
तैसें वारी विपुल लघुही क्षीण होतांच प्याया ॥
ऐसी वाट प्रथम तुजला सांगतों, ऐक तीतें ।
संदेशातें कथिन पुढतीं, पेय जो कीं अंतीतें ॥ १८ ॥
मूलश्लोक.
 
अद्रेः शृङ्गं हरति पवनः किंस्विदित्युन्मुखीभि-
दृष्टोत्साहश्चकितचकितं मुग्धसिद्धाङ्गनाभिः ॥
स्थानादस्मात्सर सनिचुलादुत्पतोदङ्मुखः खं ।
दिङ्लागानां पथि परिहरन् स्थूलहस्तावलेपान् ॥१
 
भाषान्तर.
 
सोडोनी या सरसनिचुलीं झांकिलेल्या नगास ।
जातांना तूं फिरविं वदना आपुल्या उत्तरेस ॥
उत्साहानें करिं मग नभीं उंच उड्डाण वेगें ।
 
१. अश्रु. वर्षाकालांत मेघांनी वृष्टि केल्यावर पर्वतप्रदेशावरून
वाफारा वरतीं जातो त्यावर येथें कवनें अश्रूची कल्पना केली अ
२. 'श्रुतीतें पेय ' असा अन्वय श्रुति म्हणजे कान; त्यानें पेय म्ह
पिण्यास योग्य असा भाव 3. ओल्या वेतांनीं. '
किलेल्या या नगास सोडोनी जातांना' असा अन्वय.
'सरसनिचुली