This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
आधीं भारी मन मृटु असे पुष्पसें अंगनांचें ।
त्यांतोनीया विरह मग तें काय बोलावयाचें ? ॥
आशाबंध प्रबल मनिंचा वांचवीतो तयांसी ।
ऐशा वेळीं बहुतकरुनी, हेंचि ये प्रत्येयासी ॥ १५ ॥
 
मूलश्लोक.
 
कर्तुं यच्च प्रभवति
 
महीमुच्छिलीन्ध्रामवन्ध्यां ।
 
तच्छ्रुत्वा ते श्रवणसुभगं गर्जितं मानसोत्काः ॥
आकैलासाब्दिसकिसलयच्छेदपाथेयवंतः ।
 
संपत्स्यन्ते नभसि भवतो राजहंसाः सहायाः ॥ ११ ॥
 
भाषान्तर.
 
छैत्रीं पृथ्वी सफल कॅरि, त्या ऐकुनी गैर्जिताला ।
झाल्या उत्कंठित बहु मनीं जावया मॉनसाला ॥
हंसश्रेणी कुवलंयदलें मार्गि घेवोनि खाया ।
तैं कैलासावधि करितिल प्रीतिनें त्वत्सहाया ॥ १६ ॥
मुलश्लोक.
 
आपृच्छस्त्र प्रियसखममुं तुङ्गमालिङ्गय शैलं ।
वन्द्यैः पुंसां रघुपतिपदैरराङ्कतं मेखलासु ॥
 
काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य ।
स्नेहव्यक्तिश्विरविरहजं मुञ्चतो बाष्पमुष्णम् ॥ १२ ॥
 
भाषान्तर.
 
श्रीरामाचीं उमटुनि पढ़ें वन्य, ज्याच्या तटाला
आली शोभा परम, असल्या भेट या पर्वताला ॥
 

 
१. पति कधीं भेटेल ही आशा; तिचा बंध म्हणजे बंधन. २.
अनुभवास. ३. छत्र्यांनीं. पावसाळा लागण्याच्या सुमारास जमी-
नीवर छत्र्या उगवतात. त्यावरूनं भावी धान्यसंपत्ति सूचित होते. ४.
या क्रियापदाचा 'जें' हा अध्याहृत कर्ता आहे. (जें ) ' पृथ्वी सफल
करि' असा अन्वय. ५. गर्जनेला. ६. झालेल्या ७. मानस सरोवराला.
वर्षाकाली राजहंस मानस सरोवरास जातात या प्रसिद्धीस अनुलक्षून
येथें वर्णन आहे. ८. राजहंसांच्या माला किंवा रांगा. ९. कमळांची
पानें. १०. कैलासपर्वतापर्यंत. ११. तुझी सोबत.