This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
भाषान्तर.
 
माझा स्वामी धनपति, तया कोप अत्यंत आला ।
त्यायोगानें विरह मजला हा असा प्राप्त झाला ॥
संतप्तांनां बहु सुखविशी देउनी जीवनातें ।
ऐशी कीर्ती तव ह्मणुनिया वांचवीं आज मातें ॥ १० ॥
यक्षेशाची विदित अलका राजधानी विराजे ।
बाह्योद्यानीं सुरुचिर तिच्या पार्वतीकत साजे ॥
त्याच्या शीर्षांवरील विधुंच्या चन्द्रिकेनें विशाल ।
प्रासौदाली धवलित तिच्या भासती सर्वकाल ॥ ११ ॥
आहे ऐशी रुचिर नगरी जाउनीया तियेस ।
मत्संदेशा कथन करिं तूं तेथ माझ्या प्रियेस ॥
मूलश्लोक.
 
त्वामारूढं पवनपदवीमुद्गृहीतालकान्ताः ।
प्रेक्षिष्यन्ते पथिकवनिताः प्रत्ययादाश्वसन्त्यः ॥
कः सन्नद्धे विरहविधुरां त्वय्युपेक्षेत जायां ।
 
न स्यादन्योऽप्यहमिव जनो यः पराधीनवृत्तिः ॥ ८ ॥
 
भाषान्तर.
 
जोती तूतें बघतिल नभीं, हर्षुनी पांथकान्ता ।
मागें डोळ्यावरुनि बरतीं, सारुनी कुन्तलान्तां ॥
आला वर्षाऋतु, पति गृहालागि येतील आतां ।
 
१. तापलेले अथवा पीडिलेले त्यांना. २. पाणी किंवा जीव त्यातें..
३. ही कुचेराची राजधानी. ४. बाहेरील बागेत. ५. फार सुंदर.
६. शंकर. ७. मस्तकावरील ८. चंद्राच्या ९. चांदण्यानें १०. भव्य
११. मंदिरांच्या पंक्ती. १२. माझ्या निरोपाला १३. 'नभीं जातां (जात
असतां) पान्धकान्ता हर्षुनी तूतें बघतील' असा अन्वय. १४. प्रवासी
लोकांच्या बायका. १५. कुरळ्या केशांच्या टोंकांस; अस्ताव्यस्त होऊन
डोळ्यांवर पसरलेल्या केशांस. पति प्रवासाला गेला म्हणजे पतिव्रता
स्त्रिया वेणीफणी वगैरे भूषणाचे प्रकार करीत नाहीत, यामुळे त्यांचे
केश रुक्ष होऊन यांच्या मुखप्रदेशावर मधून मधून पसरतात या
 
कविसंप्रदायास अनुलक्षून हैं वर्णन आहे.