This page has not been fully proofread.

मराठी भाषान्तर-पूर्वमेघ.
 
मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तेि चेतः ।
कण्ठाश्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे ॥ ३ ॥
 
भाषान्तर.
 
पाहोनी त्या कुतुकै हृदयीं दाटलें, चित्त झालें ।
उत्कंठेनें व्यथित, नयनीं बाष्पबिन्दुहि आले ॥
ऐसा राहे स्तिमितचि उभा त्यापुढे वेळ फार ।
मोठ्या दुःखें, करित अलकामंदिरींचे विचार ॥ ५ ॥
होतो उत्कंठित सुखितही पाहुनीया बनातें ।
दूरी ज्याचा प्रियजन वसे, काय व्हावें तयातें ? ॥
मूलश्लोक.
 
प्रत्यासन्ने नभसि दयिताजीवितालम्बनार्थी ।
जीमूतेन त्वकुशलमयीं हारयिष्यन् प्रवृत्तिम् ॥
सत्यैः कुटजकुसुमैः कल्पितार्थाय तस्मै ।
 
प्रीतः प्रीतिप्रमुखवचनं स्वागतं व्याजहार ॥ ४ ॥
 
भाषान्तर.
 
आले वर्षांदिवस सुसह प्रेयसीलागि व्हावे ।
मेघासंगें कुशल तिज या कारणें पाठवावें ॥
या भावानें कुटजँकुसुमीं पूजुनी गुह्यकानें ।
त्याला केले उचित कुशलप्रश्नही आदरानें ॥ ६ ॥
मूलश्लोक.
 
धूमज्योतिःसलिलमरुतां सन्निपातः क्व मेघः ।
संदेशार्थाः क्व पटुकरणैः प्राणिभिः प्रापणीयाः ॥
इत्यौत्सुक्यादपरिगणयन् गुह्यकस्तं ययाचे ।
कामार्ता हि प्रकृतिकृपणाश्चेतनाचेतनेषु ॥ ५ ॥
 
१. आश्चर्य. २सुखी पुरुषही सजल मेघ पाहिला असतां स्त्रीपुरुषांस
परस्परांस भेटण्याविषयीं उत्कंठा उत्पन्न होते या कविसंप्रदायास अनुल-
क्षून येथें कर्वानें उद्गार काढिले आहेत. ३. आलेले. ४. पावसाळ्याचे
दि त. ५. सहन करण्यास सोपे. ६. प्रियेला; स्त्रीला. ७. कुड्याच्या
लांनीं. ८. यक्षानें.