This page has not been fully proofread.

मेघदूताचें समवृत्त
 
सीता-स्नानें विमल सलिलं-स्रोत वाहे प्रशांत ।
तेवीं छायाद्रुम विलसती रम्य उत्तैङ्ग त्यांत ॥ २ ॥
मूलश्लोक.
 
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी ।
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ॥
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं ।
वपक्रीडा परिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥ २ ॥
 
भाषान्तर.
 
त्याच्या अंगावरिल विरहें मांस गेलें झडोनी ।
गात्रेंही तीं सकल थकलीं, गाल गेले बसोनी ॥
झालें तेवीं मुख बहु फिर्के पक्व-पर्णासमान ।
हातांतोनी वलॅय हि गळू लागलें मूल्यवान ३ ॥
ऐसे कांहीं गिरिवरि तया कंठिले मास त्यानें ।
आषाढाचा पुढतिं महिना पातलासे क्रमानें ॥
तेव्हां एके दिवशिं फिरतां काननामाजि यक्ष ।
गेलें त्याचें सहज शिखरीं अद्रिच्या जाण लक्ष ॥ ४ ॥
काळ तेवीं अरुण दिसला मेघ तेथें तयाशी ।
खेळे हत्ती जणुं मदभरें डोंगराच्या तटाशीं ! ॥
मूलश्लोक.
 
तस्य स्थित्वा कथमपि पुरः कौतुकाधानहेतो- ।
रन्तर्बाष्पश्विरमनुचरो राजराजस्य दध्यौ ॥
 
१. सीता ही रामचंद्राबरोबर अरण्यामध्ये असतां या स्थली
कांही दिवस राहिली होती. त्या प्रसंगास अनुलक्षून हें वर्णन आहे.
२. पाण्याचा झरा, प्रवाह. ३. अतिशय मंद. ४. ज्यांची सावली
दाट पडते असे वृक्ष. ५. उंच. ६. रामगिरीवरील आश्रमांत.
७. कडें.
 
८. पाण्याने भरलेला ह्मणून काळा. ९. सूर्याचें किरण
वर पडल्यामुळे तांबडा. असल्या नीलारुण मेघावर डोंगराच्या तटाशी
टक्कर मारणाऱ्या हत्तीची उत्प्रेक्षा केली आहे. हत्ती मूळचा काळा
असतो. तो डोंगराशीं टकरा घेऊं लागला ह्मणजे डोंगराची लाल
माती त्याच्या अंगावर उधळते त्यामुळे तोहि नीलारुणवर्ण होतो.