This page has not been fully proofread.

॥ श्रीः ॥
 
मेघदूताचें
संमवृत्त मराठी भाषान्तर.
 
( पूर्वमेघ. )
 
मूलश्लोक.
 
कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्ममत्तः ।
शापेनास्तंगमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ॥
यक्षश्वके जनकतनयास्नानपुण्योदकेषु ।
स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥ १ ॥
 
भाषान्तर.
 
एका यक्षाकडुनि अपुल्या दोष कामांत झाला ।
तेणें चित्तीं धनपतिचिया कोप अत्यंत आला ॥
बोले, 'मूढा ! प्रणय करितां जीसवें मत्त होशी है।
त्या कान्तेचा विरहचि अतां वर्षपर्यंत सोशीं ॥ १ ॥
शापें गेलें विभव विलया, खिन्न होवोनि गेला ।
कंठाया तो विरह-दिवसां रामगिर्याश्रमाला ॥
 
१. मूळ काव्यांतील व प्रस्तुत भाषांतरांतील लोकसंख्या सा-
रखी नाही. वृत्त मात्र एक ह्मणजे मंदाक्रान्ता हे आहे. समानवृत्तव
असल्यामुळे समवृत्त भाषान्तर असे म्हटले आहे. २. कुबेराच्या. कुबेर हा
यक्षांचा राजा होय. 3. यक्ष. ४. रामगिरी पर्वतावरील आश्रमाप्रत. राम-
गिरी हा डोंगर कोटें असावा यासंबंधानें बराच मतभेद आहे. तथापि
त्यांतल्या त्यांत वुइल्सन्साहेबांची त्यासंबंधाची कल्पना सयुक्तिक
दिसते. त्यांचें ह्मणणें असें आहे की, रामटेक या नांवाचा एक डोंगर
नागपुर शहराच्या उत्तरेस आहे. त्यावर राममन्दिर असून तेथें यात्राहि
भरत असते. या स्थलापासून वरती नजीकच उत्तरेकडे अमरकंटक
पर्वत आहे. त्याचें वर्णन प्रस्तुत काव्यांत पुढे लवकरच आले आहे..
यावरून रामगिरी म्हणजे रामटेकच असावा हैं अनुमान दृढ होतें.