This page has not been fully proofread.

मेघदूताचें संविधानक.
 
-
 
कुचेराची राजधानी अलका या नांवाची एक नगरी आहे. ती हि-
मालयाच्या उत्तरभागीं वसलेली आहे हें पुराणप्रसिद्ध आहे. या नगरींत
असणाऱ्या कोणी एका यक्षानें आपला धनी जो कुबेर त्याची एकदां
अवज्ञा केली. तेव्हां त्यानें क्रुद्ध होऊन त्या यक्षास असा शाप दिला.
कीं, हे मूर्खा ! तूं आपल्या प्रिय कांतेशीं लंपट होऊन इतका उन्मत्त
झाला आहेस तर तिचाच तुला एक वर्षपर्यंत विरह होवो. या शापानें
त्या यक्षाचें मन फार उदास झालें आणि तो विरहाचे दिवस कसे
तरी कंठावे ह्मणून रामगिरीच्या आश्रमांत जाऊन राहिला. तेथें
त्यानें मोठ्या दुःखानें कांहीं दिवस काढले. पुढे आषाढाचा महिना
आला. त्यांत एके दिवशीं अरण्यांत फिरत असतां एक नीलवर्ण
सुंदर मेघ त्या रामगिरीच्या शिखरावर आलेला त्याच्या दृष्टीस पडला.
मेघाला पाहून यक्षाच्या मनांत आपल्या स्त्रीविषयीं प्रचळ उत्कंठा
उत्पन्न झाली. नंतर या मेघालाच दूत करून आपल्या बायकोकडे
पाठविलें तर तिला आपलें कुशल समजून ती विरहामध्यें कसें तरी
प्राणधारण करील असे वाटून त्या यक्षानें त्या मेघास प्रेमपुरःसर
कुशलप्रश्न विचारले व मागाहून त्यास मोठ्या सलगनें मोठेपणा
देऊन आपलें संदेशात्मक कार्य करण्यास विनविलें आहे. प्रथम त्यानें
मेघास अलकेचा मार्ग कथन केला आहे. नंतर त्या नगरीचें,
आपल्या मंदिराचें व आपल्या बायकोच्या विरहाचें वर्णन करून
यक्षानें त्या मेघास आपल्या बायकोला कळविण्याकरितां निरोप
सांगितला आहे. येवढेंच प्रस्तुत काव्याचें संविधानक आहे. चक्षानें
मेघाला दूत कल्पिलें आहे म्हणून या काव्यास मेघदूत हैं नांव कवीनें
दिले आहे. श्रीरामचंद्रानें जानकीकडे हनुमंताला दूत हाणून पाठविलें
होतें या पुराणोक्त कथाप्रसंगावरून प्रस्तुत संविधानकाविषयीं कवीला
स्फूर्ति झाली असावी असा कित्येक विद्वानांचा समज आहे; आणि
उत्तरमेघांत ' इत्याख्याते पवनतनयं मैथिलीवोन्मुखी सा
चरणामध्यें तोच प्रसंग कवीनें स्पष्टपणे सुचविला आहे यावरून तो
समज सयुक्तिक दिसतो.
 

 
या