2023-02-21 17:21:10 by ambuda-bot
This page has not been fully proofread.
प्रस्तावना.
जलेल्या विरामचिन्हांच्या धोरणानें कविता वाचली लणजे तशा
ठिकाणीं अर्थबोध होण्यास अडचण पडणार नाहीं. कांहीं ठि-
काणीं मुळापेक्षां भाषांतरांत न्यूनाधिकभाव झालेला आहे; पण
त्यामुळे मूळ अर्थाची हानि न होण्याविषयों काळजी घेतली आहे.
भाषांतरांत येणाऱ्या कठिण शब्दांवर, पौराणिक, ऐतिहासिक व
कविसांप्रदायिक गोष्टींचा जेथें त्यांत उल्लेख आला आहे तेथें त्यां-
वरहि पृष्ठाखालीं सविस्तर टिप्पणी दिल्या आहेत. आमचें भाषां-
तर कसें काय उतरलें आहे हें सहज समजण्याकरितां तें मूळा-
सहित छापविलें आहे. याप्रमाणें प्रस्तुत भाषांतराची स्थिति आहे.
येथपर्यंत मूळकाव्याचें स्वरूप, त्याची योग्यता, प्रस्तुत भाषांत-
राचा हेतु व त्याची स्थिति यासंबंधानें चार शब्द लिहिले.
आतां मूळांतील रस व इतर चमत्कार भाषांतरांत कितपत उतरले
आहेत किंवा मुळींच उतरले नाहींत याचा निर्णय करणें हैं
काम सुज्ञ, रसिक व विद्वान् वाचकांचें आहे. तेव्हां तें आह्मी
नम्रतापूर्वक त्यांच्याकडे सोपवितों.
कांहीं कारणांमुळे आज सात आठ वर्षे हें भाषान्तर तसेंच
पडून राहिलें होतें. आलीकडे कित्येक थोर व सन्मान्य मित्रांनीं
उदारमनानें विशेष उत्तेजन दिल्यामुळे तें आज छापून प्रसिद्ध
करीत आहों. या प्रोत्साहनाबद्दल सदर मित्रांचे आह्मी आभारी
आहों. शिवाय आमचे एक रसिक मित्र रा. रा. विनायक काशी-
नाथ थत्ते यांनीं मूळांतील पाठ निवडण्याच्या कामी आह्मांस
मदत केली याबद्दल त्यांचेही आह्मी आभार मानतों.
पुर्णे, सदाशिव पेठ.
आगस्ट स. १९०१ इ.
लक्ष्मण गणेशशास्त्री लेले.
भाषान्तरकार.
७