This page has not been fully proofread.

आतां पूर्वीच्या आवृत्तींत कित्येक टिकाणीं मूळ ग्रंथाची व टीकेची
बरीच असंबद्धता दिसून आली. त्या ठिकाणीं मूळग्रंथ कायम ठेवून
टीकेंतच कोठें कोटें फेरफार केला आहे. कित्येक ठिकाणीं टीका कायम
ठेवून मूळांत फेरफार केला आहे. जसें १४५५ श्लोकांत 'अपर्यत मही-
पतेः' असा जयमङ्गलाटीकेचा पाठ आहे, परंतु मल्लिनाथाच्या टीकेंत
'अस्मार्यत महीपतिः' असा पाठ आढळतो, आणि हा जरी ( माझ्या
अल्पमतीला ) योग्य वाटतो तथापि सर्व पुस्तकांत जयमङ्गला टीका अस-
ल्यामुळे वरीलच पाठ (अस्मर्यत महीपतेः) घेतला आहे आणि दुसरा
पाठ 'अस्मार्यत महीपतिः' हा खालीं टीकेंत दिला आहे.
 
'प्रायेण मुह्यन्ति हि ये लिखन्ति' ह्या नियमाने हा प्रथमच प्रसंग
असल्यामुळे प्रकृत पुस्तकांत ज्या कांहीं चुका नजरचुकीनें राहिल्या
असतील, त्या मी विद्वद्सुहृज्जनांनीं पत्रद्वारा कळविल्यास आदरपूर्वक
स्वीकारून आगामी मुद्रणांत सुधारीन.
 
क० वि० जो०.