This page has not been fully proofread.

विशेष सूचना.
 
१ - सदई ग्रंथ छापण्याची व्यवस्था अशी ठेविली आहे कीं- विद्या -
र्थ्यांना पदच्छेद करण्यास सुलभ पडावें म्हणून संध्यक्षरावर वैदिक खरित-
स्वराप्रमाणें ।" अशी उभी रेषा दिली आहे; तिचा अर्थ - ज्या अक्षरा-
वर ही '1" उभी रेपा दिली आहे तें अक्षर उमें चिरून त्याचा पूर्वभाग
पूर्वपदांत व उत्तरभाग उत्तरपदांत सामील करावा, असे समजावें. जसें
ग्रथम श्लोकांत 'इत्युदाहृतः' आणि 'पितरमु॑पागमत् ' ह्या दोहोंवर '१'
ही रेपा आहे. आतां त्यु= त्य् + उ = त्यु; मु=म् + उ = मु; म्हणजे इत्य्,
(इति) उदाहृतः; पितरम् उपागमत् अशीं पदें समजावीत. इति याचें
इत्य् हें पाणिनीच्या 'इको यणचि' या सूत्रानें झालें आहे; ह्याप्रमाणें
पदच्छेद दाखवून सामासिक नामांत शब्द - ( प्रातिपदिक ) छेदही ''
ह्या चिह्नानें दाखविला आहे. आतां जेथें संधीमुळे '–' ह्या चिन्हानें शब्द-
च्छेद दाखवितां येत नाहीं, तेथें संध्यक्षराखालीं वैदिकानुदात्तस्वराप्रमाणें
'' अशी आडवी रेपा दिली आहे. म्हणजे तीच शब्दच्छेदरेषा खालीं
ओढली आहे. जसें ३ श्लोकांत (सर्वेषु-भृताम् ) वें यांत र्व+इ = वें,
झणजे सर्व-इषु-भृताम् असें जाणावें. येथें सर्व + इषु सर्वेषु हें पाणि-
नीच्या 'आद्गुणः' या सूत्रानें झालें आहे असे समजावें. स्वल्पविराम-
चिह्नाचा उपयोग करून वाक्येंही निरनिराळीं तोडून दाखविली आहेत.
ह्याप्रमाणे मूळ ग्रंथाला बाध न येतां वाक्य-पदशब्दच्छेद दर्शविला; परंतु
कित्येक स्थलीं 'अभ्रून् नृपः' (श्लोक ११). 'स्त्रीभिर् युतानि' (श्लो०
७), 'ज्ञाता ऽऽशयस् तस्य' (श्लोक ११). असा पदच्छेद दाखविला
आहे. त्या स्थळीं 'अभृनृपो', 'स्त्रीभिर्युतानि', 'ज्ञाताशयस्तस्य'
असेंच पाठकालीं म्हणावें. पदच्छेदबोधापेक्षां संयुक्त पाठ दुर्बोध नाहीं.
 
.